पंढरपूर (सोलापूर) - मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी येथील अज्ञात कारणावरून एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन बुधवारी सकाळी 9 ते 10 च्या सुमारास आत्महत्या केली. राणी औदुंबर चौगुले (वय 27) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
मंगळवेढ्यात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या - पंढरपूर बातम्या
पती घरात नसताना छताला दोरी बांधून गळफास घेत महिलेने जीवनयात्रा संपवली. या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
औदुंबर चौगुले यांच्याबरोबर तीन वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. पती घरात नसताना घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेत त्यांनी जीवनयात्रा संपवली. या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत पती औदुंबर चौगुले यांनी पोलिसांना माहिती दिली. महिलेने घरात कोणी नसताना माळवदाला असलेल्या हुकाला दोरी लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -सोलापुरातील तीन खासगी डॉक्टरांना नोटीस, कोविड नियमावलीचे उल्लंघन केल्याचा ठपका