महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 12, 2019, 12:07 PM IST

Updated : Oct 12, 2019, 12:45 PM IST

ETV Bharat / state

आगामी काळात टेंभूर्णी-अहमदनगर रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार- संजय शिंदे

जिल्हा परिषदच्या माध्यमातून या भागात विकासकामे करण्यात आली आहेत. तर आगामी काळात करमाळा-टेंभूर्णी रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या भागातील वीज प्रश्न व इतर कामे देखील पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांनी करमाळातील जणतेला दिले.

संजय शिंदे

सोलापूर- जिल्हा परिषदच्या माध्यमातून या भागात विकासकामे करण्यात आली आहेत. तर आगामी काळात करमाळा-टेंभूर्णी रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या भागातील वीज प्रश्न व इतर कामे देखील पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांनी करमाळातील जनतेला दिले.

प्रतिक्रिया देताना अपक्ष उमेदवार संजय शिंदे

कंदर येथे शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सदरील प्रतिक्रिया दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव भांगे उपस्थित होते. यावेळी, आम्ही दोघेजण खांद्याला खांदा लावून करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करणार आहे. संजय शिंदे यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. म्हणूनच मी योग्य माणसाला पाठिंबा देत आहे. याची मला खात्री आहे, असे प्रतिपादन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, तालुक्यात उद्योग धंदे उभारले नाहीत. म्हणून तालुक्यातील युवकांना पुणे-मुंबईत कामासाठी जावे लागते. जनता किती दिवस फसणार आहे. निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कारखान्याची एफआरफी, कामगारांचे पगार का थकवले आहेत यावर बोलावे. आगामी काळात आदिनाथ व मकाई कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून दाखवू. त्याच्या माध्यमातून आम्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.

यावेळी, आदिनाथचे संचालक चंद्रहास निमगिरे यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला. सभेचे प्रास्ताविक भास्कर भांगे यांनी केले. तर सूत्रसंचालन रवी जाधव यांनी केले. तर आण्णा पवार यांनी आभार मानले. सभेमध्ये शंकरराव भांगे, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, उद्धव माळी, राजेंद्र बारकुंड, सूर्यकांत पाटील, शंभूराजे जगताप, कन्हैयालाल देवी, राहुल सावंत, चंद्रकांत सरडे, चंद्रहास निमगिरे, धनंजय मोरे, तात्या सरडे, संजय गुटाळ, सविता शिंदे, तृप्ती साखरे, जालिंदर बसळे, सुनील सावंत, दत्तात्रय जाधव, नवनाथ भांगे, अण्णा पवार, नीलकंठ देशमुख, रोहिदास तानाजी झोळ, सुहास साळुंखे, अमोल भांगे, विलास राऊत, भास्कर भांगे, आबा आदलिंग, सतीश सुर्यवंशी, सुजित बागल, तात्या मस्कर, सागर दौंड, आनंद शिंदे, प्रवीण पाटील, राहुल कोळेकर, श्रीकांत साखरे, अशपाक जमादार, दत्ता मस्के, धनाजी शिंदे, गोकुळ माने, हनुमंत लोकरे व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा-करमाळ्यात अर्धा तास खोळंबली कोणार्क एक्सप्रेस; पोलीस आणि खानपान कर्मचाऱ्याच्यात बाचाबाची

Last Updated : Oct 12, 2019, 12:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details