सोलापूर- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शहरात रविवारी 4 जुलैला मराठा क्रांती आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. फौजदार चावडी पोलिसांनी सदर मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तरीदेखील मोर्चा काढणार असल्याची भूमिका अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मांडली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी हेरिटेज मंगल कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
जुना पुणे नाका येथील संभाजी चौक जवळील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा काढला जाणार आहे. यानंतर संभाजी महाराज पुतळ्यापासून पायी चालत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. राज्यातील सर्वात मोठा मोर्चा सोलापुरात काढला जाणार असल्याची माहितीही नरेंद्र पाटील यांनी सांगितली. सर्वोच्च न्यायालायने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर संपूर्ण मराठा समाजात एक संतापाची लाट पसली आहे. लवकरात लवकर मराठा माजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
परवानगी नाकारली -
रविवारी 4 जुलै रोजी 11 वाजता संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा क्रांती आक्रोश मोर्चाची सुरुवात होणार आहे. हा परिसर फौजदार चावडी पोलीस ठाण्यांतर्गत येतो. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी या मोर्चास परवानगी नसल्याचा आदेश पारित केला आहे. सोलापुरात कोरोना महामारीचा वाढता संसर्ग पाहता व तसेच डेल्टा प्लस आणि म्यूकरमायकोसिसचे रुग्ण वाढतील यामुळे मराठा क्रांती आक्रोश मोर्चास परवानगी नाकारली जात आहे, असे आदेश पारित केले आहे.
हेही वाचा -मराठा आरक्षणाचा चेंडू आता केंद्र सरकारच्या कोर्टात, आघाडी सरकारच्या नेत्यांना दिलासा?
परवानगी मिळो अगर न मिळो...