महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विठ्ठल कोणाला पावणार?  अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून 'या' नेत्यांच्या नावांची चर्चा

महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसकडे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती देण्यात आली आहे, तर शिवसेना व राष्ट्रवादीकडे अनुक्रमे सिद्धिविनायक ट्रस्ट व शिर्डी मंदिर समिती वाटेला आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर गेल्या दोन वर्षापासून अध्यक्ष पद रिक्त आहे. महाविकास आघाडी मधील सहकारी पक्ष असणाऱ्या काँग्रेसकडेही समिती देण्यात आली आहे.

विठ्ठल कोणाला पावणार?
विठ्ठल कोणाला पावणार?

By

Published : Jun 24, 2021, 5:18 PM IST

पंढरपूर -राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये देवस्थान समित्यांचे वाटप करून घेण्यात आले आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपद काँग्रेसकडे गेले आहे. त्यानंतर काँग्रेसमधील अनेक इच्छुकांची नावे आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. यातून राजकीय आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश युवक अध्यक्ष सत्यजित तांबे, विद्यमान मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे यामध्ये पांडुरंग कोणाला पावतो, हे पाहणे गरजेचे आहे.

आमदार प्रणिती शिंदे, सत्यजित तांबे यांचे नाव आघाडीवर-

महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसकडे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती देण्यात आली आहे, तर शिवसेना व राष्ट्रवादीकडे अनुक्रमे सिद्धिविनायक ट्रस्ट व शिर्डी मंदिर समिती वाटेला आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर गेल्या दोन वर्षापासून अध्यक्ष पद रिक्त आहे. महाविकास आघाडी मधील सहकारी पक्ष असणाऱ्या काँग्रेसकडे ही समिती देण्यात आली आहे. त्यामुळे या समितीवर सोलापूर मध्य विधानसभेचे आमदार प्रणिती शिंदे व युवक काँग्रेस राज्य अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. यासाठी पक्षश्रेष्ठींकडे या नावाचा आग्रह धरण्यात आला असल्याचे समजते.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला राज्यमंत्री पदाचा दर्जा..

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षाला राज्य मंत्री पदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. 2017 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर समितीला राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. त्यामुळे या समितीवर अध्यक्षपद हे राज्यमंत्री दर्जाचे आहे. मंदिर समिती मध्ये एकूण 13 सदस्यांचे मंडळ आहे. 2017 साली कराड येथील अतुल बाबा भोसले यांची विठ्ठल मंदिर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती, त्यांनी सुमारे दोन वर्षाचा कालावधीही पूर्ण केला होता. 2019 पासून विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्षपद रिक्त आहे. मात्र समितीवर अध्यक्ष पदी निवड होणाऱ्या व्यक्तीचे राजकीय पूर्ण पुनर्वसन केले जात असते.

विठ्ठल मंदिर समितीचा अध्यक्ष हा वारकरी संप्रदायातला असावा-

पंढरपूरचा पांडुरंग हा वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. वर्षातील प्रमुख चार वाऱ्या या ठिकाणी भरत असतात. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला त्या दृष्टीने फार महत्त्व आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा अध्यक्ष हा वारकरी संप्रदात्यामधील असावा. याबाबत वारकरी संघटना व महाराज मंडळींकडून मागणी होत आहे. त्यामुळे विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सध्याचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे नावही काँग्रेसच्या गटातून आघाडीवर असल्याचे समजते. औसेकर संस्थांना वारीची मोठी परंपरा आहे. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद इच्छुक उमेदवारांची नावे गुलदस्त्यात असल्याचे समजते.

ABOUT THE AUTHOR

...view details