सोलापूर- पंढरपुरात येणाऱ्या भाविकांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघा जणांना पंढरपूर पोलिसांनी अटक केली आहे. मोबाईल चोरांकडून लाख रुपये किंमतीचे 55 मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
पंढरपुरातील भाविकांचे मोबाईल लंपास करणारे तिघे अटकेत, 55 मोबाईल जप्त - pandharpur police station
पंढरपुरात येणाऱ्या भाविकांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघा जणांना पंढरपूर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 4 लाख रुपये किंमतीचे 55 मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
![पंढरपुरातील भाविकांचे मोबाईल लंपास करणारे तिघे अटकेत, 55 मोबाईल जप्त जप्त केलेले मोबाईल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5431635-thumbnail-3x2-solapur.jpg)
पंढरपूर शहरात यात्रा कालावधीत एकादशी, मंगळवार बाजार दिवशी अशा ठिकाणी तसेच पार्किंग जागा असलेल्या ठिकाणांतून विविध कंपन्यांचे किमती मोबाईल चोरी होण्याचे प्रकार घडत होते. याबाबत पंढरपूर शहर पोलीस निरिक्षक दयानंद गावडे यांनी सखोल चौकशी करुन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांच्या मागावर पोलीस पथक नेमले होते. दरम्यान याबाबत शोधमोहीम व कसून तपासानंतर पोलिसांनी शहरातील तीन आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये एक अल्पवयीन असून दोन सज्ञान आहेत. त्यांच्याकडून एकूण 55 मोबाईल सापडले आहेत. या मोबाईलची अंदाजे किमती 4 लाख 7 हजार 700 एवढी असल्याची माहिती पंढरपूर उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - हैदराबाद-उन्नाव नाही सोलापुरात, मध्यप्रदेशच्या सुखरुप गुडियाची कहाणी