महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्राकडून मदत घेणे त्यामध्ये गैर काय? ती तर त्यांची जबाबदारीच - ठाकरे - मुख्यंमत्री ठाकरे यांची विरोधकांवर टीका

राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यावर शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने केंद्राने मदत करावी अशी मागणी केली. मात्र, विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी या मागणीवर निशाणा साधत प्रत्येक वेळी केंद्राकडून मदत मागता, मग तुम्ही काय करणार? तुम्ही जबाबदारी टाळू नका म्हणत टीका केली. त्या टीकेला मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर देत भाजपवर निशाणा साधला आहे.

getting help from the Center
मुख्यमंत्री ठाकरे

By

Published : Oct 19, 2020, 4:35 PM IST

Updated : Oct 19, 2020, 4:49 PM IST

सोलापूर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अक्कलकोट तालुक्याच्या पाहणी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावेळी केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ठाकरे यांनी केंद्राकडून मदत घेण्यात गैर काय? असा सवाल विरोधकांना केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यावर शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने केंद्राने मदत करावी अशी मागणी केली. मात्र, विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी या मागणीवर निशाणा साधत प्रत्येक वेळी केंद्राकडून मदत मागता, मग तुम्ही काय करणार? तुम्ही जबाबदारी टाळू नका म्हणत टीका केली. त्या टीकेला मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर देत भाजपवर निशाणा साधला आहे.

फडणवीस यांनी बिहार मधील निवडणुकांत लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या राज्यातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असा टोलाही फडणवीस यांना लगावला आहे. राज्यावर आलेल्या या नैसर्गिक आपत्ती काळात केंद्र सरकारकडून गैर काय आहे, जर केंद्राने जीएसटीचे पैसे थकवले नसते तर ही वेळ आलीच नसते, असेही ठाकर म्हणाले. या शिवाय केंद्र सरकारने देश आणि राज्याची जबाबदारी घ्यायची असते. तसेच पंतप्रधान मोदींनीही मदतीचे आश्वासन दिले असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

ठाकरे पुढे म्हणाले, धोका अजूनही टळले नाही. वेध शाळेने सूचना दिल्या असून प्रशासनाने जीवित हानी होऊ नये याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. मी सध्या कोणतीही घोषणा करणार नाही.पंचनामे सुरू आहेत.लवकरच मदतनिधी प्रशासनाकडून मिळेल असे आश्वासन दिले आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री यांच्या हस्ते पंढरपूर येथील कुंभार घाटात मृत्यूमुखी झालेल्या वारसांना शासनाची मदत म्हणून धनादेश वाटप करण्यात आले.या पत्रकार परिषदेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,पालकमंत्री दत्ता भरणे,कृषी मंत्री भुसे,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार,आमदार प्रणिती शिंदे आदी उपस्थित होते.

Last Updated : Oct 19, 2020, 4:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details