सोलापूर - येथे सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क घालणं बंधनकारक असून रस्त्यावर थुंकण्यास बंदी करण्यात आली आहे. शिवाय दुकानदार यांनी मास्क बांधणं, हात मोजे घालणं बंधनकारक असून तसे न केल्यास आता शंभर ते पाचशे रुपये दंडाची कारवाई होणार आहे.
शहरात रविवारी आणखी 18 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामुळे, एकूण संख्या 583 इतकी झाली आहे तर, मृतांची संख्या 51 वर पोहोचली आहे. एकूण 5 हजार 770 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यातील 5 हजार 543 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 4 हजार 960 अहवाल निगेटिव्ह तर 583 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, 227 अहवाल प्रतिक्षेत आहेत. रविवारी एका दिवसात 120 अहवाल प्राप्त झाले. यापैकी 102 निगेटिव्ह तर, 18 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तसेच, रविवारी 5 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे तर, 5 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
रविवारी रुग्ण मिळालेले विभाग पुढीलप्रमाणे -
घोंगडेवस्ती भवानी पेठ 1 पुरुष
शनिवार पेठ 1 महिला
निलमनगर 2 महिला
शास्त्री नगर 1 पुरुष
रविवार पेठ 1 पुरुष, 1 महिला
सलगरवस्ती डोणगांव रोड 1 पुरुष
दमाणीनगर 1 महिला
गंगानगर 1 महिला
न्यू पाच्छा पेठ 2 पुरुष