महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उजनीचे पाणी चोरण्याचा डाव उधळून लावू - रणजितसिंह नाईक निंबाळकर

उजनीचे पाणी चोरण्याचा डाव आपण उधळून लावू, मात्र त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या पाठिंब्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

ujni water dispute news
उजनीचे पाणी चोरण्याचा डाव उधळून लावू - रणजितसिंह नाईक निंबाळकर

By

Published : Apr 27, 2021, 10:36 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे उजनीचे पाणी चोरण्याचा बारामतीकर व इंदापूरकरांनी मिळून डाव घातला आहे. उजनीचे पाणी चोरण्याचा डाव आपण उधळून लावू, मात्र त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या पाठिंब्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावरून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकारण तापल आहे.

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांना पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णयाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेकडून पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले होते. यासंदर्भात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली होती. उजनी धरणातून कोणत्याही प्रकारचे पाणी इंदापूरला घेऊन जाणार नाही. तसे असेल तर आपण राजकीय संन्यास घेऊ, असा इशारा त्यांनी त्यावेळी दिला होता. त्यानंतर आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यात उडी घेतली आहे. उजनीचे पाणी चोरण्याचा डाव आपण उधळून लावू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा -

इंदापूरसाठी मंजूर केलेल्या पाच टीएमसी पाण्याचा निर्णय शासनाने तातडीने मागे घ्यावा, अन्यथा सोलापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात तीव्र आंदोलन खासदार नाईक निंबाळकर यांनी दिला. उजनीचे पाणी हे सोलापूर सातारा जिल्ह्याच्या हक्काचे पाणी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सहभागी होण्याची गरज -

उजनी पाणी प्रश्नांवर जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी एकत्रित येण्याची गरज आहे. पवार कुटुंबियांनी आजपर्यंत फक्त बारामतीच्या बाबतीतच विचार केला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे मुग गिळून या प्रकरणी गप्प बसणार आहेत. जिल्ह्यातील नेत्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी व चॉकलेट मिळणार असल्यामुळे या प्रश्नाविषयी कोणतीही भूमिका घेणार नसल्याची टीका खासदार निंबाळकर यांनी केली.

हेही वाचा - IPL मध्ये सहभागी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्याची व्यवस्था स्वत:च करावी - पंतप्रधान मॉरिसन

ABOUT THE AUTHOR

...view details