सोलापूर :पंढरपूर पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे यंदा झालेल्या पावसाने 100 टक्के भरले आहे. सलग तिसऱ्या वर्षी धरण 100 टक्के भरले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उजनी धरणात 117 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 27 ऑगस्ट 2018, यानंतर 7 ऑगस्ट 2019 व आज 31 ऑगस्ट 2020 ला उजनी धरण शंभर टक्के भरले आहे.
सोलापूर जिल्ह्याची चिंता आता मिटली आहे. सोमवारी उजनी 102 टक्के भरला असून धरणात येणारी आवक पाहता कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. तीन महिन्यात हे धरण हळूहळू टक्केवारीच्या शंभरीजवळ पोहोचले आहे. आता धरणातून मुख्य कालव्यात 800 क्युसेकने पाणी सोडण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. याच बरोबर भीमा, सीना बोगदा व सीना माढा उपसा सिंचन योजनेत ही पाणी सोडले जात आहे.