सोलापूर -शहर व जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. सिद्धेश्वर मंदिर परिसरात पावसाचे व तलावाचे पाणी आत गाभाऱ्यापर्यंत आले आहे. बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. पण सकाळी ८ वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला.
धुव्वादार पावसामुळे सिद्धेश्वर मंदिराच्या सभामंडपात शिरले पाणी
सिद्धेश्वर मंदिर परिसरात पावसाचे व तलावाचे पाणी आत गाभाऱ्यापर्यंत आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांना प्रवेश बंद केल्याचे मंदिराचे पुजारी मल्लिकार्जुन हिरेहब्बू यांनी सांगितले.
सोलापूर
सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या तलावात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे तलावाचे पाणी मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत आले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत दुसऱ्यांदा पाणी आले आहे. पुरसदृश परिस्थिती मंदिर परिसरात निर्माण झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांना प्रवेश बंद केल्याचे मंदिराचे पुजारी मल्लिकार्जुन हिरेहब्बू यांनी सांगितले.