सोलापूर- सध्या राज्यात वरुणराजा बरसायला सुरुवात झाली आहे. उजनी धरणाच्यावर असलेल्या पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठा वाढत आहे. आज (बुधवार) दुपारी 4 वाजेपर्यंत उजनी धरणातील पाणीसाठा हा वजा 13 टक्केपर्यंत आला आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे.
उजनी धरणात पाण्याची आवक वाढली, पाणीसाठा वजा 13 टक्के
उजनी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उजनी धरणातील पाणी पातळी वाढत आहे. वजा 50 टक्केपर्यंत गेलेले उजनी धरण हे आता वजा 13 टक्क्यांपर्यंत आले आहे. धरणातील पाणी पातळी ही 490 मीटरपर्यंत आली आहे.

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणात पाणी येत आहे. बंडगार्डन येथून 4 हजार क्युसेकने धरणात पाणी येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा यावर शेतकऱ्यांचे विशेष लक्ष असते. मागील वर्षी देखील धरण 100 टक्के भरले होते. आता धरण वजा आहे. पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यावर्षी देखील धरण भरेल अशी आशा येथील शेतकऱयांना आहे.