सोलापूर - राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अर्थकारणाचा केंद्रबिंदू असलेले उजनी धरण आता भरायला सुरुवात झाली आहे. सध्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने भीमा नदी पात्रातील धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड येथून उजनी धरणांत आज 2,717 क्युसेकचा येवा म्हणजे विसर्ग येत असल्याने 24 तासांत उजनी धरणाच्या पाणी पातळीत 1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आज उजनी धरणातील पाणीसाठा -21.87% झाला आहे. हा जलसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत 34 टक्के जास्त आहे. विसर्गात आणखी वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी या हंगामाची सुखद सुरुवात झाली आहे.