सोलापूर- पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील विहाळ गावात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे विहाळ गाव पाणीदार झाले आहे. तसेच परतीच्या पावसाने पाणी पातळीत वाढ झाली आहे. याचा प्रत्यय करमाळा-राशिन रोडवरील विहाळ नाळेवस्तीत आला. नाळेवस्तीतील हातपंपाला न हापसता आपोआप हातपंपातून पाणीवाहत आहे. परिसरात हा हातपंपत कुतहलाचा विषय बनला आहे.
करमाळा तालुक्यात मोसमी पावसाने पाठ फिरवली होती. त्यानंतर मात्र परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी एकाचवेळी कोरडा दुष्काळ आणि ओला दुष्काळ अनुभवला. परतीच्या पावसाने तसेच जलसंधारणाची कामांमुळे पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. करमाळा-कोर्टी रस्त्यावर नाळेवस्ती येथील हातपंपाला आपोआप पाणी येत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची तहान हा हातपंप भागवत असून हा कुतुहलाचा विषय बनला आहे.