सोलापूर (पंढरपूर) -राज्याच्या संस्कृतीमध्ये वारकरी सप्रदायाला अनन्य साधारण महत्व आहे. यातील वारकरी याकडे आदराने आणि एका भुषणाने महाराष्ट्र कायम पाहात आला आहे. दरम्यान, वारकऱ्यांना आर्थिक आधार दिला पाहिजे या भावनेतुन वारकऱ्यांना राज्य सरकारकडून पाच हजार मानधन दिले जाणार असल्याचे, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केला आहे. याबाबत वारकरी साहित्य परिषदचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी मागणी केली होती.
माहिती देताना वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील 'राज्यातील कलावंताच्या मानधनामध्ये वाढ व्हावी'
महाराष्ट्र राज्य शासन सांस्कृतिक कार्य विभाग व वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने विधान भवन येथे संतपीठ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील कलावंताच्या मानधनामध्ये वाढ व्हावी. तसेच, वारकरी संप्रदायासाठी भव्य अशा संतपीठाटी उभारणी करावी अशी मागणीही या बैठकीमध्ये पाटील यांनी केली आहे. या सर्व मागण्यांचा विचार करून मंत्री अमित देशमुख यांनी मागण्या मान्य केल्याची घोषणा केली.
'वारकरी संप्रदायातील वारकर्यांना मानधन सुरू होणार'
राज्यातील कलाकारांबरोबर वारकरी संप्रदायामधील कीर्तनकार, पखवाज वादक व गायक यांनाही मानधन सुरू होणार आहे. या निर्णयाचे वारकरी साहित्य परिषदेकडून स्वागत करण्यात आले आहे. पंढरपुर येथील फडकरी मंडळींना कायमस्वरूपी मानधन सुरू होणार आहे. या सर्व निर्णयांचा वारकरी साहित्य परिषदेकडून आनंद व्यक्त केला जात असल्याची माहिती पाटील यांनी दिली.