महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्री विठ्ठल-भक्तांच्या भेटीने व गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता; वारकरी परतीच्या प्रवासाला निघाले - kirtan

मंगळवारी पोर्णिमेच्या गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता झाली. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर 'पुंडलिका वरदे हरी, श्री न विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 'च्या जयघोषाने दुमदुमुन गेला होता. श्री विठ्ठलाच्या भेटीनंतर पालख्या व वारकरी परतीच्या प्रवासाला निघाले.

वारकरी परतीच्या प्रवासाला निघाले

By

Published : Jul 16, 2019, 11:18 PM IST

सोलापूर- गोपाळकाला गोड झाला..गोपाळाने गोड केला... असे म्हणत गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण मंदिरात लाखो भाविकांच्या हजेरीत गोपाळकाल्याचा उत्सव पार पडला. आणि मंगळवारी पोर्णिमेच्या गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता झाली.

श्री विठ्ठल-भक्तांच्या भेटीने आषाढी यात्रेची सांगता

श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी मानाच्या सात पालख्या मंदिरात येतात. यावेळी मंदिर समितीच्या वतीने सर्व पालख्यांच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पालख्यांतील पादुक डोक्यावर घेऊन विठ्ठलाचे दर्शन घेतल्या गेले. आणि या भेटीने आषाढी सोहळ्याची सांगता झाली. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर 'पुंडलिका वरदे हरी, श्री न विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 'च्या जयघोषाने दुमदुमुन गेला होता. आषाढी वारीसाठी चालत आलेल्या पालख्या संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत सोपानकाका, संत एकनाथ तसेच संत निवृत्तीनाथ यांच्या इतर पालख्याही श्री विठ्ठलाच्या भेटीनंतर याच दिवशी परतीच्या प्रवासाला निघाल्या.

दरम्यान मंगळवारी खंडग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी आळंदी आणि देहूकडे परतीसाठी प्रस्थान होणार आहे. मंगळवारी सकाळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे गोपाळपूरात आगमन झाले. त्यानंतर सर्वच पालख्यांचे आगमन येथे झाले. अंमळनेरकर महाराजांचे काल्याचे कीर्तनही झाले. काल्याचा प्रसाद घेवून आषाढीवारी पूर्ण झाल्याचा आनंद घेत वारकरी परतीच्या प्रवासाला निघाले.

यावेळी मंदिर समितीचे प्रांताधिकारी तथा कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्या अॅड.मधवी निगडे आणि शकुंतला नडगिरे यांनी पालख्यांच्या श्रमिकांचे स्वागत व सत्कार केला. तसेच पालख्यातील विणेकरी आणि वारकरी यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. विठ्ठल - भक्तभेटीचा हा सोहळा चोख बंदोबस्तात पार पाडला.

ABOUT THE AUTHOR

...view details