महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 21, 2020, 9:42 PM IST

ETV Bharat / state

चिथावणीखोर वक्तव्याचा निषेध; वारिस पठाणांच्या प्रतिमेला सोलापुरात फासलं काळ

कर्नाटकच्या गुलबर्गामधील एका जाहीर सभेत बोलताना वारिस पठाण यांनी काही चिथावणीखोर वक्तव्ये केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा सोलापुरात प्रहार संघटनेने निषेध केला. त्यांच्या प्रतिमेला काळे फासून चप्पलने मारण्यात आले.

वारिस पठाण निषेध
वारिस पठाण निषेध

सोलापूर - गुलबर्गा येथे झालेल्या जाहीर सभेत एमआयएम पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याचा सोलापुरात प्रहार संघटनेने निषेध केला. संघटनेच्यावतीने पठाण यांच्या प्रतिमेला काळे फासून चप्पलने मारण्यात आले.

वारिस पठाणच्या प्रतिमेला फासलं काळ

संपूर्ण देशभरात सर्वच जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हिंदू-मुस्लीमांसह सर्वच जाती-धर्माच्या लोकांनी बलिदान आणि योगदान दिले आहे. मात्र, काही नेते हिंदू-मुस्लीम समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत. वारिस पठाणने चिथावणीखोर भाषण देवून भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहोचवण्याचे काम केले आहे. म्हणून त्यांच्या जोरदार निषेध केला आहे, प्रहारचे संपर्कप्रमुख जमीर शेख यांनी सांगितले.

हेही वाचा -चिथावणीखोर भाषण करणाऱ्या वारिस पठाणांवर कारवाई करा; भाजपची मागणी

भारत देशात सध्या लागू होत असलेल्या सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्यांना संपूर्ण देशभरातून विरोध होत आहे. असे असताना वारिस पठाण यांनी १५ कोटी लोक हे १३५ कोटी लोकांवर भारी आहेत, असे म्हणने मुर्खपणाचे आहे. त्यांनी तमाम भारतीयांची माफी मागावी. अन्यथा त्यांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा प्रहारचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी दिला.

कर्नाटकच्या गुलबर्गामधील एका जाहीर सभेत बोलताना वारिस पठाण यांनी काही चिथावणीखोर वक्तव्ये केली. 'आम्ही 15 कोटी आहोत मात्र, 100 कोटींवर भारी आहोत, इट का जबाब पत्थर से देना हम सिख गए हैं, स्वातंत्र्य मागितल्यानं मिळत नाही तर ते हिसकावून घ्यावं लागतं' असे पठाण म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details