सोलापूर - वाखरी येथील पालखी तळावर रिंगण सोहळा पार पडल्यावर सर्व संतांच्या दिंड्या पंढरीत दाखल झाल्या आहेत. पंढरीत दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांना विठ्ठलाच्या पायाशी पोहोचून दर्शन घेता येत नाही. म्हणून अनेकजण मंदिराच्या शिखराचे दर्शन घेऊन 'जातो माघारी पंढरी नाथा' असे म्हणत आपल्या गावाकडे परत जात आहेत.
'पोहोचली वारी...शिखर दर्शन झाले, जातो माघारी..बा विठ्ठला म्हणत वारकरी परतीच्या वाटेवर - सोहळा
'जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची' असे म्हणत देहू-आळंदीहून अडीचशे किलोमीटरचे अंतर पार करून आज सर्व संतांच्या दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत.

पंढरपुरात दाखल झालेली पालखी.
'पोहोचली वारी...शिखर दर्शन झाले, जातो माघारी..बा विठ्ठला म्हणत वारकरी परतीच्या वाटेवर...
मंदिरात दर 3 सेकंदाला एक वारकरी पांडुरंगाचे दर्शन घेत असतो. मात्र, लाखोंच्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांना कमी कालावधीत दर्शन करणे शक्य नाही. म्हणून पायीवारी करणारे वारकरी कळस दर्शन घेत आहेत आणि हा आनंद सोहळा डोळ्यात साठवून गावाकडे जात आहेत ते....पुढच्या वारीच्या प्रतीक्षेत.
Last Updated : Jul 11, 2019, 12:05 PM IST