सोलापूर (पंढरपूर) -गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पांडुरंगाचे दर्शन भाविकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. वारकऱ्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणीच्या पायाशी माथा टेकून दर्शन घेता यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली होती. (Warakaris take Vitthal-Rukmini darshan ) त्या प्रस्तानावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी दिली आहे अशी माहिती समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पदस्पर्शाने सुरू करण्याची मागणी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी व भाविक भक्तांकडून होत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना परिस्थिती विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन बंद आहे. विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शनाची सोय विठ्ठल मंदिर समितीकडून करण्यात आली आहे. त्यासंबंत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सदस्यांकडून विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन सुरू व्हावी अशी मागणी करण्यात आली. त्या संदर्भात राज्य शासनाकडे मागणी करण्यात आला होती.