सोलापूर - जिल्ह्यातील माढा तालुका भाजपाध्यक्ष संजय कोकाटे यांना विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेतून हाकलून देण्यात आल्याची घटना घडली आहे. राज्य शासनाने संजय कोकाटे यांना कारखान्यावर तज्ज्ञ संचालक म्हणून नियूक्त केलेले आहे. तरीदेखील त्यांना कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत हजर न राहू दिल्याने संजय कोकाटे यांनी कारखान्याच्या गेटवर जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन केले.
संजय कोकाटे यांना राज्य शासनाने तज्ज्ञ संचालक म्हणून विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यावर नियुक्त केले आहे. मात्र, साखर कारखाना प्रशासन संचालक नेमणूकीच्या विरोधात न्यायालयात गेले आहे. त्यामूळे कोकाटे यांना सभेसाठी उपस्थित राहू दिले नाही. कारखान्याच्या या घटनेचा निषेध म्हणून संजय कोकाटे यांनी सभा संपेपर्यंत कारखान्याच्या गेटवर जमिनीवर बसून ठिय्या मांडला.