सोलापूर -श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांचे अलंकापुरीकडे(आळंदी) प्रस्थान झाले. बुधवारी सकाळी गोपाळपूर येथे गोपालकाला झाल्यानंतर गोपाळकृष्ण मंदिरातून विठ्ठलाच्या पादुका घेऊन पालखी मार्गस्थ झाली.
ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या पादूकांचे अलंकापुरीकडे प्रस्थान - पंढरपूर नगरप्रदक्षिणा
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांचे अलंकापुरीकडे(आळंदी) प्रस्थान झाले. मंदिर समिती सदस्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व विठ्ठल महाराज वासकर यांच्या हस्ते पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले.
विठ्ठलाच्या पादूकांचे अलंकापूरीकडे प्रस्थान
हेही वाचा - त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त किल्ले रायगडावर दीपोत्सव, शेकडो दिव्यांनी उजळला रायगड किल्ला
पंढरपूरची नगरप्रदक्षिणा करून पालखी श्री विठ्ठल मंदिरात दाखल झाली. याठिकाणी मंदिर समिती सदस्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व विठ्ठल महाराज वासकर यांच्या हस्ते पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. विठ्ठलाच्या चरणी पादुका धरून तिथून त्या पालखीमध्ये ठेवण्यात आल्या.