सोलापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील आषाढी वारीचा सोहळा रद्द करुन मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले जाणार आहे. अगदी त्याचप्रमाणे माढ्यातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरदेखील दर्शनासाठी बंद ठेवले जाणार आहे. दरवर्षी साजरा होणारा विठ्ठल महोत्सव यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे रद्द करण्यात आला आहे.
कोरोनामुळे माढ्यातील विठ्ठल मंदिरही राहणार दर्शनासाठी बंद, विठ्ठल महोत्सवाची परंपरा खंडीत
दरवर्षी आषाढ एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरात विविध कार्यक्रम तसेच शहरातून पालखी मिरवणूक काढली जाते. यंदा मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विठ्ठल महोत्सवाची परंपरा खंडीत होणार आहे.
दरवर्षी आषाढ एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरात विविध कार्यक्रम तसेच शहरातून पालखी मिरवणूक काढली जाते. यंदा मात्र विठ्ठल महोत्सवाची परंपरा खंडीत होणार आहे. माढा पोलीस ठाण्यातमध्ये स.पो.नि अमुल कादबाने यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा अॅड. मीनल साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत आषाढी एकादशी, कोरोना, माढ्यातील विठ्ठल मंदिराविषयी चर्चा झाली. बैठकीअंती १ जुलैच्या पहाटे ४.३० वाजता विठ्ठलाची महापुजा साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यानंतर मंदिर हे दर्शनासाठी पूर्णपणे बंद असणार असून मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
तालुक्यासह परगावातून येणाऱ्या विठ्ठल भक्तांनी माढ्यातील मंदिरात दर्शनासाठी न येण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. बैठकीस नगराध्यक्षा अॅड. मीनल साठे, दादासाहेब साठे, गुरुराज कानडे, दिनकर चव्हाण, मदन मुंगळे, पाडुरंग देशमुख, मंदिराचे पुजारी आदी उपस्थित होते.