पंढरपूर- आज विजया दशमी अर्थात दसरा. नवरात्रीच्या काळात अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणीला रोज निरनिरळण्या वेशभुषा आणि अलंकारांनी सजवण्यात येत होते. त्या अलंकारामध्ये पंढरीरायाचे रुप अधिक लोभस दिसून येत होते. तर दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर आज श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा गाभारा सजविण्यात आला आहे. झेंडूच्या फुलांची आकर्षक अशी आरास मंदिराच्या गाभाऱ्यात आणि मंडपात करण्यात आली आहे. गाभाऱ्यातील ही सुंदर सजावट पुण्यातील भक्त राम जांभुळकर यांनी केली आहे.
नवरात्रिनिमित्त श्री विठ्ठल, श्री व्यंकटेश, श्री महालक्ष्मी मातेची पारंपरिक पोशाखात आकर्षक अलंकार पूजा बांधण्यात आली होती. नऊ दिवसात रुक्मिणी मातेचे मनमोहक रुप दिसत होते. त्याच प्रमाणे आज विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरात गाभारा व समोरील मंडपात फुलांची आरास करण्यात आली आहे. विठ्ठ्लास आज गुलाबी रंगाचा शेला असेलली वेशभूषा करण्यात आली आहे. सुपारीच्या गुलाबी फुलांचा हार घालण्यात आला आहे. या सजावटीत सावळ्या विठू रायाचे सौदर्य अधिकच खुलून दिसत आहे.