सोलापूर -कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूरचे प्रसिद्ध विठ्ठल मंदिर ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, या काळात विठोबाचा काकडा, धुपआरती, शेजारती अशा नित्योपचार पूजा सुरू राहणार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.
पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर 31 जुलैपर्यंत बंद - सोलापूर कोरोना ताजी बातमी
पंढरपूर आणि परिसरात कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून विठ्ठल रुक्मिणी मंदिर 31 जुलैपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. मात्र, या काळात विठोबाचा काकडा, धुपआरती, शेजारती अशा नित्योपचार पुजा सुरू राहणार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.
देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर 18 मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद केले होते. यामध्ये चैत्री यात्रा, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, रामनवमी, आषाढी एकदशी यासह महिन्याची एकादशी, असे अनेक उत्सव रद्द करून साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले. आषाढी काळात कोणत्याही भाविकाला पंढरपुरात प्रवेश देण्यात आलेला नव्हता. तर, फक्त मानाच्या नऊ पालख्यांना प्रवेश दिला गेला होता. त्यांनाही नियमानुसार दोन दिवसाची परवानगी प्रशासनाने दिली होती.
दरम्यान, पंढरपूर आणि परिसरात कोरोना संसर्ग वाढत चालला असून पंढरीत सध्या 84 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून विठ्ठल रुक्मिणी मंदिर 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.