सोलापूर ( पंढरपूर ) :पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील मोठा उत्सव आहे. या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा होणार आहे. परंतु राज्यातील सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यानंतर सर्वसामान्य लोकांमध्ये मात्र संतप्त प्रतिक्रिया असून उद्धव ठाकरेंना धोका दिल्याच्या भावना आहे. खरंतर कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी महापूजा केली होती. त्यांच्यासोबत पूजेचा मान मिळालेले वारकरी म्हणजे विठ्ठल बडे महाराज यांनी मात्र उद्धव ठाकरे हे चांगलेच मुख्यमंत्री आहेत. अशा भावना व्यक्त केल्या आहेत. राजकारण तर मोठे होत राहील. परंतु माणूस म्हणून उद्धव ठाकरे पुन्हा जर ते काम करत राहिले तर मुख्यमंत्री सुद्धा होतील. अशा भावना महाराजांनी व्यक्त केले आहे.
उद्धव ठाकरेंसोबत पूजा करण्याचा मान : विठ्ठल महाराज बडे हे गहीनाथ गडावरुन येणाऱ्या वामनभाऊंच्या दिंडीमध्ये सहभागी असतात. गेल्या सात वर्षापासून त्यांच्या ही परंपरा चालू आहे. ते स्वतः पायी वारी करतात. ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस उद्धव ठाकरेंसोबत मानाची पूजा करण्याचा मान विठ्ठल बडे यांना मिळाला होता. गेल्या दहा ते अकरा वर्षांपासून विठ्ठलाच्या मुख्य विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात विनाची सेवा करतात. पूर्ण वेळ विणेकरी म्हणून ते या ठिकाणी काम करत आहेत. त्या मानाच्या पाच विनेकरांना विठ्ठलाचा नैवेद्य जेवण म्हणून दिले जाते. त्यामध्ये सुद्धा विठ्ठल महाराज बडे यांचा सहभाग होता. त्यांचे रोजचे जेवण म्हणजे विठ्ठलाचा दिलेला प्रसाद असतो.