महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

80 वर्षीय आजोबा विधानसभेच्या रिंगणात, कीर्तनातून मिळणाऱ्या मानधनातून लढवताहेत निवडणूक - आजोबा विधानसभेच्या रिंगणात

लोकशाहीच्या उत्सवात निवडणुकीला सामोरे जाताना उमेदवाराकडे इच्छाशक्ती व जिद्द असणे गरजेचे असते. अशीच जिद्द  विष्णू कुंभार या 80 वर्षीय आजोबांकडे आहे. त्यांनी माढा विधानसभेचा अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे.

80 वर्षीय आजोबा विधानसभेच्या रिंगणात

By

Published : Oct 7, 2019, 9:24 PM IST

सोलापूर- माढा तालुक्यातील परिते गावचे एक 80 वर्षीय आजोबा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे किर्तन, भजन करून मिळणाऱ्या मानधनातून हे आजोबा माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. विष्णू कृष्णा कुंभार, असे या निवडणूक लढवणाऱ्या आजोबाचे नाव आहे.

80 वर्षीय आजोबा विधानसभेच्या रिंगणात

लोकशाहीच्या उत्सवात निवडणुकीला सामोरे जाताना उमेदवाराकडे इच्छाशक्ती व जिद्द असणे गरजेचे असते. अशीच जिद्द विष्णू कुंभार या 80 वर्षीय आजोबांकडे आहे. त्यांनी माढा विधानसभेचा अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे. विशेष म्हणजे पेशाने वारकरी संप्रादयात असलेले कुंभार हे हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात भजन, किर्तन, भारुड सादर करतात. या कार्यक्रमातुन मिळणारे मानधन कुंभार हे आपल्या बँकेच्या बचत खात्यात टाकतात आणि त्या साठलेल्या मानधनातून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. यंदाची ही त्यांची तिसरी निवडक आहे.

हेही वाचा -सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या 3, भाजपसह काँग्रेसच्या एकाची बंडखोरी

माढा मतदारसंघाचा अपेक्षित विकास झालेला नाही. मतदारसंघाच्या व जनसामान्यांच्या विकासासाठी मी निवडणुकीत उमेदवारी दाखल करुन आखाड्यात उतरलो आहे. कुंभार यांचे कुटुंबीय त्यांना निवडणुकीसाठी पाठिंबाही देत नाहीत अन विरोधही करत नाहीत.

कुंभार यांनी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातून निवडणूक लढवत असताना शिंदे विरोधात निवडणूक लढवली होती. तसेच त्यांनी माढा विधानसभा मतदारसंघातुन माजी आमदार विनायक पाटील, एस.एम. पाटील यांच्या विरोधात देखील विधानसभा निवडणुक लढवलेली आहे.

हेही वाचा -सोलापूर : काँग्रेसचे शिवाजी काळुंगे 'नॉट रिचेबल'; राष्ट्रवादीच्या गोटात धाकधूक

सर्वसामान्य माणूस देखील निवडणुक प्रक्रियेत सक्रिय व्हायला हवा. विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीच मी उमेदवारी अर्ज भरला आहे. ही माझी तिसरी वेळ आहे. तर यंदाच्या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे, असे कुंभार यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details