महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर-वधू वरात चक्क पोलीस ठाण्यात; नातेवाईकांवर गुन्हा दाखल

सांगोला तालुक्यातील बंडगरवाडी येथे लग्नसमारंभात चक्क पोलीस पाहुणे म्हणून पोहोचले आणि लग्नासाठी शेकडो जणांची गर्दी झाल्याने वधू-वरांच्या लग्नाची वरात चक्क पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली. तसेेेच वधू-वरांचे नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

लग्न वरात पोलीस ठाण्यात
लग्न वरात पोलीस ठाण्यात

By

Published : Apr 25, 2021, 10:58 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -राज्यासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्यामध्ये कडक निर्बंध घातले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन केले जात आहे. मात्र सांगोला तालुक्यातील बंडगरवाडी येथे लग्नसमारंभात चक्क पोलीस पाहुणे म्हणून पोहोचले आणि लग्नासाठी शेकडो जणांची गर्दी झाल्याने वधू-वरांच्या लग्नाची वरात चक्क पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली. तसेेेच वधू-वरांचे नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वधू-वरांचे नातेवाईकांची वरात पोलीस ठाण्यात -

सांगोला तालुक्यातील बंडगरवाडी येथील वधु व कटफळ येथील वराचे लग्न लावले जात होते. या लग्नसमारंभासाठी कोरोना नियमांचे कोणतेही पालन न करता शेकडो वऱ्हाडी सहभागी झाली. मात्र याची माहिती सांगोला पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने लग्नाच्या दिवशी दाखल झाले. लग्नाची वरात पोलीस स्टेशनच्या दारात, या म्हणीप्रमाणे वधू-वरांचे नातेवाईकांना सांगोला पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले. कोरोना नियमांचे कोणतेही पालन न केल्यामुळे जवळच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.

केवळ 25 लोकांनाच परवानगी -

राज्य शासनाकडून विवाह समारंभासाठी 25 लोकांची परवानगी देण्यात आली आहे. मात्र बंडगरवाडी येथील विवाह सोहळ्यामध्ये शेकडो नागरिकांना एकत्र आणण्यात आले. त्यामुळे नियम मोडून विवाह सोहळ्यासाठी गर्दी जमली. याप्रकरणी वधू-वरांचे नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये नवरदेव त्याचे आई वडील तसेच नवरीसह आई-वडील नातेवाईक अन्य जणांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details