माढा (सोलापूर)- पाणी फांऊडेशनच्या ‘सत्यमेव जयते’ वाॅटर कप स्पर्धेत तालुक्यात पहिला क्रमांक पटकावलेल्या वडाचीवाडी(अउ) मधील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावर पाणी फाऊंडेशनकडुन आलेली १० लाखांची रक्कम आली आहे. ती रक्कम जलसंधारणासाठी खर्ची करण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे केली. शिवाय या मागणीसह त्यांनी आक्रमक भूमिका घेत गावाला मिळालेली ट्राफी देखील तहसील प्रशासनाला परत दिली. मात्र हा तुमच्या गावाला मिळालेला बहुमान असल्याचे सांगत तहसीलदारांनी ग्रामस्थांना ती परत दिली.
वाटर कपची रक्कम खर्च करण्यासाठी ग्रामस्थांचा जोर.. प्रशासन मात्र शांतच - Madha pani foundation trophy
ग्रामपंचायतचे ग्रामसेवक समाधान यादव हे पाणी फाऊंडेशनची आलेली रक्कम अनेक महिन्यांपासुन सांगुन देखील खर्च करीत नव्हते. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी तहसील प्रशासनास लेखी निवेदन देऊन आलेला निधी जलसंधारणाच्या कामासाठी तातडीने खर्ची करण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायतचे ग्रामसेवक समाधान यादव हे पाणी फाऊंडेशनची आलेली रक्कम अनेक महिन्यांपासुन सांगुन देखील खर्च करीत नव्हते. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी तहसील प्रशासनास लेखी निवेदन देऊन आलेला निधी जलसंधारणाच्या कामासाठी तातडीने खर्ची करण्याची मागणी केली आहे. २०१९ मध्ये झालेल्या पाणी फांऊडेशनच्या स्पर्धेत गावाने सहभाग घेतला होता. पाण्याचे महत्व ध्यानी घेऊन आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी गावकर्यांनी दिवस रात्र श्रमदान केले आणि गावाने तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला. गावाला दहा लाखांचा निधी व सन्मान चषक मिळाले. हा निधी ग्रामपंचायतच्या खात्यावर येऊन अनेक महिने लोटून गेले. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाकडे निधी जलसंधारणच्या कामासाठी खर्ची करण्यासाठी वारंवार मागणी केली. मात्र याबाबत कसलीही कार्यवाही झाली नाही. पाऊस येण्याआधी या निधीतून जलसंधारणाची कामे झाल्यास गावाला फायदा होईल. मात्र, मागणीची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी आक्रमकपणा घेत शुक्रवारी तहसील प्रशासनाला ट्राफीसह निवेदन दिले आहे. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी मार्तड जगताप, कमलाकर कदम, रमेश भुईटे, विजय भुईटे, आप्पासाहेब कोकरे, सागर कदम, राजेंद्र जाधव, उमेश भुईटे, रमेश कदम आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पैसे खात्यावर आलेले आहेत. सर्व प्रशासकीय व कागदपत्राची प्रकिया पुर्ण केल्याशिवाय पैसे खर्च करता येत नाहीत. लाॅकडाऊनमुळे गावात ग्रामसभादेखील झालेली नाही. लवकरच पैसे खर्च करण्यासंदर्भात वरिष्ठांशी बोलुन प्रक्रिया राबवली जाणार असुन जलदगतिने जलसंधारणाची कामे होण्याकरिता पाठपुरावा करत असल्याची माहिती ग्रामसेवक समाधान यादव यांनी सांगितले.
या संदर्भातले निवेदन प्राप्त झाले असुन याबाबत गटविकास अधिका्र्यांशी बोलुन योग्य ती कार्यवाही केली जाईल. सोमवारी गटविकास अधिकारी यांनी ग्रामस्थांना बोलावले आहे, असे माढ्याचे तहसिलदार
राजेश चव्हाण यांनी सांगितले.