सोलापूर- विजापूर नाका पोलीसठाण्यातील डीबी पथकाने दोन संशयीत चोरट्यांना अटक केले आहे. दोघांकडून 2 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या मुद्देमालात 71 ग्रॅम सोने, एक मोटारसायकल, तीन गॅस सिलिंडर व पाच हजार रुपये रोख रक्कम, असा मुद्देमाल आहे.
माहिती देताना पोलीस अधिकारी खबऱ्याच्या माहितीमुळे दोघे पोलिसांच्या ताब्यात
विजापूर नाका पोलीस ठाण्याचे डीबी पथक हद्दीत गस्त घालत होते. घरफोडीतील संशयित दोन्ही आरोपी हे विजापूर नाका हद्दीत आहेत, अशी माहिती एका खबऱ्याने पोलिसांना दिली. यानुसार पोलिसांनी ताबडतोब दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी घरफोडी आणि इतर गुन्ह्यांची माहिती दिली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. ऋषिकेश भाऊसाहेब पवार (रा. सोलापूर) याबाबत माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब त्याला ताब्यात घेउन त्याची चौकशी केली असता प्रवीण ईश्वर जाधव याचे नाव सांगितले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी 2 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडे दिला.
हेही वाचा -बँक खासगीकरणाविरोधात सोलापुरात कर्मचाऱ्यांचे आंदोलन
हेही वाचा -वीज बिल माफीसाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुतळ्याचे दहन