महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वंचितसह वारकरी सेनेचे उद्या आंदोलन, पंढरपुरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात - वारकरी सेना बातमी

महाराष्ट्र सरकारने जर 30 ऑगस्टपर्यंत विठ्ठल मंदिराचे दार उघडले नाही तर 31 ऑगस्टला एक लाख वारकऱ्यांसह मंदिरात प्रवेश करु, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

pandharpur
पंढरपूर बसस्थानक

By

Published : Aug 30, 2020, 7:57 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - येथील विठ्ठल मंदिर दर्शनाला वारकरी आणि भक्तासाठी खुले करावे या मागणीसाठी विश्व वारकरी सेना, बहुजन विकास आघाडीच्या वतीने उद्या (31 ऑगस्ट) आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा फौजफटा तैनात करण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान एसटी बसची तोडफोड होऊ नये, म्हणून पंढरपूर आगारातील एसटी बसेस बंद राहणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर उद्या (सोमवार) पंढरीत दाखल होण्याची शक्यता आहे. पंढरपुरात एक लाख वारकऱ्यांचा उपस्थितीत दाखल होणार असल्याचा दावा वंचितकडून करण्यात आला आहे. पंढरपूरमध्ये प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. पंढरपूर येथे वचिंतच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक करत असताना अनेक गोष्टींना सूट दिली आहे. मात्र, मंदिर प्रवेशाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आता मंदिर प्रवेशाचा मुद्दा हातात घेतलेला आहे.

हेही वाचा -आता दर रविवारीही सुरू राहणार सोलापूरची बाजारपेठ - पालिका आयुक्त

ABOUT THE AUTHOR

...view details