महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 24, 2021, 7:13 PM IST

ETV Bharat / state

नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी वाटेगावमध्ये अनोखा उपक्रम

जिल्ह्यातील वाटेगावमध्ये गेल्या वर्षी जागतिक ग्रंथ दिनानिमित्त "मी घरचा वाचक" हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमासाठी वाचन चळवळ महाराष्ट्र राज्यचे संस्थापक राहूल वेदपाठक यांनी पुढाकार घेतला होता. लॉकडाऊन काळात नागरिकांनी घरीच राहावे हा त्या मागचा उद्देश होता. आज या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

"मी घरचा वाचक" उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद
"मी घरचा वाचक" उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

सांगली -जिल्ह्यातील वाटेगावमध्ये गेल्या वर्षी जागतिक ग्रंथ दिनानिमित्त "मी घरचा वाचक" हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमासाठी वाचन चळवळ महाराष्ट्र राज्यचे संस्थापक राहूल वेदपाठक यांनी पुढाकार घेतला होता. लॉकडाऊन काळात नागरिकांनी घरीच राहावे हा त्या मागचा उद्देश होता. आज या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

"मी घरचा वाचक" उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

कोरोनाचे नियम पाळून पुस्तकांची देवाण घेवाण

जिल्ह्यातील वाटेगावमध्ये गेल्या वर्षी जागतिक ग्रंथ दिनानिमित्त ''मी घरचा वाचक" हा उपक्रम राबवण्यात आला होता. लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी घरी राहावे, त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, असे विविध उद्देश त्यामागे होते. या उपक्रमाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत ऑनलाईन पद्धतीने पुस्तकाची देवाण-घेवाण होते, वाचन चळवळ वाचनालयाच्या संपर्क क्रमांकावर अथवा हॉट्सऍप ग्रुपवरून पुस्तके मागवण्याची सोय करण्यात आली आहे. पुस्तक मागवल्यानंतर वाचन चळवळीचे स्वयंमसेवक कोरोनाचे सर्व नियम पाळून ते पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवतात.

होही वाचा -विरार पश्चिममधील 'त्या' रुग्णालयाविरोधात अखेर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details