पंढरपूर (सोलापूर)-आषाढी यात्राकाळात बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. आषाढी यात्रेसाठी 2700 पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या सर्वांचे लसीकरण करण्यात आले असून यात्रा कालावधीत बंदोबस्तात असलेले पोलीस यांना संरक्षक किट देण्यात येणार आहे. पंढरीत भाविक येऊ नयेत म्हणून तीनस्तरीय बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलत असताना दिली.
पोलीस प्रशासनाकडून तीनस्तरीय बंदोबस्त
कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे यात्रा कालावधीत गर्दी होऊ नये म्हणून 17 ते 25 जुलै या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरातील 10 गावात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. पंढरपुरात भाविक येऊ नयेत म्हणून जिल्हा, तालुका व शहर असा तीनस्तरीय बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.