सोलापूर- शहर व जिल्ह्यासाठी 24 जूनपासून राज्य शासनाकडून लसीचा पूरवठा न झाल्याने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील लसीकरण ठप्प झाले आहे. तर डेल्टा प्लस संसर्गाच्या भीतीने राज्य शासनाने दुसरा स्तर रद्द केल्याने सोलापुरात तिसरा स्तर लागू केला आहे. सोलापुरातील दुकानदारांना कोरोना निगेटिव्ह चाचणी किंवा दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लसच उपलब्ध नसल्याने लसीचे राजकारण सुरू आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया पहावयास मिळत आहे.
सोलापूर शहराला 22 जूनपासून लसीचा पूरवठाच नाही
कोरोना महामारीची तिसरी लाट रोखण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने शहरातील 40 केंद्रावर लसीकरण सुरू केले आहे. पण, 22 जूनपासून सोलापूर शहराला लसीचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे शहरातील नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. दुसरीकडे लसीकरण करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना बसवून फुकटचा भत्ता द्यावा लागत आहे. 18 ते 44 वयोगटातील साडे तीन लाख लाभार्थी आजही लसीपासून वंचित आहेत. हे लाभार्थी लसीबाबत वारंवार विचारणा करत आहेत. सोलापूरच्या लोकसंख्येचा विचार करून शासनाने जास्तीत जास्त लसींचा पूरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.
खासगी पातळीवर 60 हजार लसींची मागणी
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने, खासगी कंपन्यासह खासगी रुग्णालयांनी एकूण 60 हजार लसींची मागणी केली आहे. पण, गेल्या आठवडा भरापासून पुण्याहून लसी न आल्याने खासगी पातळीवर लसी वितरित केल्या नाहीत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील 36 रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लस न मिळाल्याने सर्व रुग्णालयातील लसीकरण ठप्प झाले आहे.
पहिला डोस
आरोग्य कर्मचारी - 100 टक्के लसीकरण