करमाळा(सोलापूर) - तालुक्यातील केम येथील उत्तरेश्वर पेट्रोलियम यांच्यावतीने केम गावातील गरीब व गरजू 501 कुटूंबाना मोफत किराणा माल किटचे वाटप करण्यात आले.
देशात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमिवर तिसऱ्या टप्प्याचे लॉकडाऊन लावण्यात आले आहे. रोजंदारीवर जाणाऱ्या मजुरांच्या हाताला काम नाही, त्यामुळे त्यांची उपासमार दिवसेंदिवस वाढत आहे. याचे गांभिर्य लक्षात घेऊन श्री उत्तरेश्वर पेट्रोलियम केमचे संचालक महेश शिवाजी तळेकर यांच्याकडून केम गावातील कुटुंबाना संसारपयोगी किराणा मालाचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले.
करमाळ्यात उत्तरेश्वर पेट्रोलियमच्या वतीने 501 कुटूंबाना किराणा किट - किराणा मालचे वाटप
श्री उत्तरेश्वर पेट्रोलियम केमचे संचालक महेश शिवाजी तळेकर यांच्याकडून केम गावातील कुटुंबाना संसारपयोगी किराणा मालाचे घरो-घरी जाऊन वाटप करण्यात आले.
करमाळ्यात उत्तरेश्वर पेट्रोलियमच्या वतीने 501 कुटूंबाना किराणा किटचे मोफत
हॆ कार्य यशस्वी करण्यासाठी संतोष रायचुरे, महावीर तळेकर, अच्युत पाटील ,उपसरपंच नागन्नाथ तळेकर, नितीन खटके,गोरख खानट,अध्यक्ष सागरराज तळेकर,रत्नाकर तळेकर,सागर दोंड,अनंता तळेकर, भाऊसाहेब दोंड, नवनाथ खानट, दादा पारखे, प्रमोद दिक्षित, मोहन दोंड, प्रमोद मारवाडी, संतोष कुर्डे, भैया झारेकरी, गोरख शिंदे यांचे सहकार्य लाभले.