सोलापूर: देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि खडतर परीक्षांमध्ये युपीएससीचा समावेश होतो. या परीक्षेला बसलेल्या काही लाख तरूणांपैकी 933 जणांनी यावर्षी यश मिळवले आहे. यात सोल्यापूरच्या भावना एच एस यांनी देशात 55 व्या रँकने उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे. तर या यशाचा श्रेय आई व मित्र मंडळींना दिला आहे. हा त्यांचा सहावा प्रयत्न होता. पहिल्या दोन प्रयत्नांत भावनाला कोणतीही पोस्ट मिळाली नव्हती.
देशात 55 वी रँक प्राप्त केली:2015 व 2016 साली भावना या भूगोल विषयासह पूर्व परीक्षा दिल्या होत्या. 2018 मध्ये पूर्व, मुख्य, मुलाखत परीक्षा देत भावना एच. एस. यांची इंडियन रेल्वे ट्राफिक सर्व्हिस या विभागात निवड झाली होती. मिळालेल्या पोस्टवर रुजू होत भावना यांनी भारतीय रेल्वेमध्ये नोकरी सुरू केली. नोकरी करत असताना 2022 साली झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भावना यांनी देशात 55 वी रँक प्राप्त केली आहे.
सहाव्या प्रयत्नांत पोस्ट काढली: 2015 पासून भावना यांचा यूपीएससीचा प्रवास सुरु होता. 2019 वर्षी भावना मुलाखत पर्यंत गेल्या होत्या. 2020 मध्ये मुख्य परीक्षा देखील उत्तीर्ण होऊ शकल्या नव्हत्या. 2022 मध्ये मोठ्या जोमाने, अथक परिश्रम घेत जिद्दीने परीक्षा दिली. यावर्षी देशात 55 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांच्या या मोठ्या यशाने सोलापूर मध्ये रेल्वे विभागात सर्वस्तरातून कौतुक होत आहे. या यशाचे सर्व श्रेय भावना यांनी आईला दिला आहे. 2022 साली झालेल्या परीक्षेत भावना यांनी अंथर्रोपोलॉजी हा वैकल्पिक विषय ठेवला होता.
मामाने केले पालनपोषण: सोलापूर मध्य रेल्वे विभागात कार्यरत असलेल्या भावना या मुळच्या बंगळुरू जिल्ह्याच्या आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन या विषयात इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2015 पासून अभ्यास सुरू केला. घरची परिस्थिती बेताची व वडील नसल्याने मामाने पालनपोषण करत वाढवले. ज्या मामानी मला साथ दिली दुर्दैवाने कोरोना काळात दोन वर्षांपूर्वी मामाचा मृत्यू झाला.