महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोमवारपासून मंद्रुप येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू, 42 गावांच्या मागणीला यश - सोलापूर

सीना-भीमा खोऱ्यातील बेचाळीस गावाच्या नागरिकांसाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मंद्रुप येथे अप्पर तहसील कार्यालयाचे उद्या उद्घाटन होणार आहे. यामुळे मंद्रुप तसेच आसपासच्या 42 गावातील ग्रामस्थांचे सोलापूरला येण्या-जाण्याचा त्रास कमी होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालय

By

Published : Jan 19, 2020, 7:21 PM IST

सोलापूर- सीना-भीमा खोऱ्यातील बेचाळीस गावाच्या नागरिकांसाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मंद्रुप येथे अप्पर तहसील कार्यालयाचे उद्घाटन उद्या म्हणजेच सोमवारी (दि. 20 जाने.) आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे.

उद्यापासून मंद्रुप येथे अप्पर तहसील कार्यालय सुरु


या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, गजानन गुरव, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, संजीव जाधव आणि मंद्रूपच्या सरपंच कलावती खंदारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा - 'देश मोदी चालवतात की मोहन भागवत ?'

दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नागरी भाग असून ग्रामपंचायतींची संख्यादेखील जास्त आहे. परिणामी दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयावर प्रशासकीय ताण पडत आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे अतिरिक्त तहसील कार्यालय स्थापन करण्याची मागणी पुढे आली होती.

ऑक्टोबर, 2017 मध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आमदार देशमुख यांनी याबाबतचा पाठपुरावा केला. महसूल विभागाच्या अतिरिक्‍त मुख्य सचिवांनी याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. या प्रस्तावास जुलै, 2019 च्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मंद्रुप येथे अप्पर/अतिरिक्‍त तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या नवीन पदांच्या मंजुरीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. तांत्रिक कारणांमुळे उद्घाटन लांबले होते, ते उद्यापासून लोकांच्या सेवेत सुरू होत आहे.

हेही वाचा - मंकी हिल-कर्जत स्थानकादरम्यान ‘अप लाइन’ वर तांत्रिक कामांमुळे 'या' गाड्या रद्द

मंद्रुप येथे अतिरिक्‍त तहसील कार्यालय झाल्यामुळे ग्रामीण भागातून लोकांना विविध कामांसाठी सोलापूरला जावे लागणार नाही. शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा - 'संविधानामुळेच मला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान'

ABOUT THE AUTHOR

...view details