सोलापूर : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Minister Ajay Mishra) हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. (Minister Ajay Mishra in Solapur). यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर सडकून टीका केली आहे. (Minister Ajay Mishra on Bharat Jodo yatra). राहुल गांधी हे काँग्रेसमध्ये व भारतात प्रस्थापित होत नाहीत म्हणून वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे त्यांना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, राहुल गांधी यांच्याकडे काही नवीन अजेंडा नाही, सावरकर व मोदीवर टीका करण्यापलीकडे राहुल गांधीकडे काही विषय नाहीत, अशी टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी केली. (Ajay Mishra on Rahul Gandhi and Bharat Jodo yatra).
Minister Ajay Mishra : भारत जोडो यात्रा म्हणजे राहुल गांधींना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न - गृहराज्यमंत्री अजय मिश्रा - अजय मिश्रा सोलापूर
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Minister Ajay Mishra) यांनी सोलापूरात राहुल गांधी आणि त्यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली आहे. (Ajay Mishra on Rahul Gandhi and Bharat Jodo yatra). भारत जोडो यात्रेचा खटाटोप केवळ राहुल गांधींना राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी केला गेला आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. (Minister Ajay Mishra in Solapur).
यांनी काळ्या पाण्याची नाही, सोयीची शिक्षा भोगली : भाजप हा खरा इतिहास सांगतो. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द बोलले जात आहेत. मात्र सावरकरांनी इंग्रजांच्या विरोधात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती. त्यांनी इतर नेत्यांसारखी सोईची शिक्षा भोगली नाही. इंग्रजांची हुकूमत असताना काही नेत्यांनी सोयीची शिक्षा भोगली. त्यांना तुरुंगात वृत्तपत्र, रेडिओ आणि घरंच जेवण मिळत होते. पण सावरकरांना अशा सुविधा नव्हत्या, असे अजय मिश्रा यांनी म्हटले आहे.
ओवेसीचा पक्ष केवळ दोन व्यक्तींचा : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला देखील विरोध केला आहे. यावर अजय मिश्रा यांनी म्हटले की, त्यांच्या विरोधामुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही. एमआयएम हा पक्ष केवळ दोन व्यक्तींचा पक्ष राहिला आहे. त्यांच्या विरोधात बोलून मी ओवेसी किंवा त्यांच्या पक्षाला मोठं करणार नाही.