महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाढती महागाईचा निषेध; सोलापुरात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरच मांडली चूल - rising inflation solapur ncp agitation

'अच्छे दिन' असा नारा देत सत्तेत आलेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये महागाई वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले गेले आहे. कोरोना महामारी आणि सततच्या लॉकडाऊनमुळे जनता बेहाल आहे.

union government crititised over rising inflation by solapur ncp
सोलापुरात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरच मांडली चूल

By

Published : Jul 3, 2021, 11:44 AM IST

Updated : Jul 3, 2021, 12:10 PM IST

सोलापूर- शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाढत्या महागाईचा विरोध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी व पदाधिकऱ्यांनी रस्त्यावर चूल मांडून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. गॅस सिलेंडरच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. याचा निषेध करून गॅस सिलेंडरची टाकी प्रतिकात्मकरित्या मृत दाखवण्यात आली.

याबाबत आंदोलकांची प्रतिक्रिया

सर्वसामान्य जनतेचे हाल -

'अच्छे दिन' असा नारा देत सत्तेत आलेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये महागाई वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले गेले आहे. कोरोना महामारी आणि सततच्या लॉकडाऊनमुळे जनता बेहाल आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली. पेट्रोलच्या दराने प्रतिलिटर शंभरी पार केली आहे. त्यासोबतच घरगुती वापराचे गॅस सिलेंडरच्या किमतीतही पुन्हा वाढ करण्यात आली आहे. या महागाईमुळे किंवा गॅस दरवाढीमुळे जनतेला जगावे की मरावे? असा प्रश्न पडला आहे. सर्वसामान्य जनतेचे हाल होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या निषेध आंदोलनावेळी केला आहे.

हेही वाचा -बारा तासांत हत्येच्या दोन घटनांनी नागपूर हादरले; आरोपी अटकेत

महिलांनी रस्त्यावर चूल मांडून गॅस दरवाढीचा केला विरोध -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा विरोध करत रस्त्यावर चूल मांडून भाकऱ्या थापल्या. 50 वर्षांपूर्वी गॅस सिलेंडरचा इंधन म्हणून घरगुती वापर नव्हता. त्यावेळी महिला चूल मांडून स्वयंपाक करत होत्या. मात्र, गॅस सिलेंडरचा घरगुती वापर सुरू झाल्यापासून चुलीवरचे स्वयंपाक बंद झाले होते. मात्र, सद्यस्थितीत घरगुती वापरातील गॅस सिलेंडरची एक टाकी एक हजार रुपयांपर्यंत त्याची किंमत झाली आहे. त्यामुळे महिलांना आता पुन्हा 50 वर्षांपूर्वीसारखे चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.

गोपीचंद पडळकरांना महत्त्व देत नाही -

बुधवारी सोलापुरात भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांवर टीका केली होती. त्याचे पडसाद सोलापुरात उमटत आहे. पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरदेखील पडळकर समर्थकांनी दगडफेक केली. याबाबत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भारत जाधव म्हणाले, पडळकर यांना मी महत्त्व देत नाही.

हेही वाचा -अनैतिक संबंधातून खून अन् केला अपघाताचा बनाव; धुळ्यातील धक्कादायक प्रकार

Last Updated : Jul 3, 2021, 12:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details