सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी (Ujni Water Issue) हे इंदापूर तालुक्यातील 22 गावांना दिले जाणार असल्याने उजनी पाणी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. मोहोळ येथील शासकीय विश्रामगृह येथे सर्वपक्षीय शेतकरी नेत्यांची बैठक संपन्न झाली. उजनी पाणी संघर्ष समितीच्या नेत्यांनी सोलापूर जिल्ह्यातील 11 आमदार व 2 खासदारांना बांगड्याचा आहेर पाठवून (11 MLAs and two MPs sent to Bangdaya) निषेध केला आहे.
भाजपवर केली टीका : उजनी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी बोलताना माहिती दिली की, महाविकास आघाडीची सरकार असताना तत्कालीन पालकमंत्री व इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता भरणे लाकडी निंबोडी योजने अंतर्गत उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूर व बारामती कडे वळविण्यात येणार होता. सोलापूरच्या सर्व नेत्यांनी व शेतकरी संघटनांनी याचा तीव्र विरोध केला होता. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही लाकडी निंबोडी योजना रद्द झाली असल्याचे लेखी परिपत्रक काढले होते. आता पुन्हा एकदा लाकडी निंबोडी योजनेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. महाविकास आघाडीचा अट्टाहास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) हे पूर्ण करत आहेत का?असा प्रश्न निर्माण केला जात आहे.