महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उजनी धरण 100 टक्के भरण्याची चिन्हे; धरणातून वीज निर्मिती कालवा व सीना-माढा बोगद्यात पाणी सोडले - सोलापूर पाउस

भीमा खोर्‍यात होत असलेल्या दमदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प भरल्याने उजनीच्या वर असलेल्या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सर्व धरणांमधून एकूण 1 लाख 28 हजार क्युसेक पाणी उजनीत सोडले गेले आहे.

http://10.10.50.85:6060///finalout4/maharashtra-nle/finalout/04-August-2019/4040795_solapur.mp4

By

Published : Aug 4, 2019, 8:58 PM IST

Updated : Aug 4, 2019, 11:40 PM IST

सोलापूर - भीमा खोर्‍यात होत असलेल्या दमदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प भरल्याने उजनीच्या वर असलेल्या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सर्व धरणांमधून एकूण 1 लाख 28 हजार क्युसेक पाणी उजनीत सोडले गेले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या दुष्काळी सोलापूर जिल्ह्याला आता दिलासा मिळाला आहे.

उजनी धरण 100 टक्के भरण्याची चिन्हे

उजनीत येणारा दौंडचा विसर्ग 90 हजार क्युसेकच्या पुढे गेला आहे. तर, जलाशयात खडकवासला धरणातून 35 हजार क्युसेक, चासकमान 23 हजार , भामा आसखेडा 12 हजार 500, आंध्रा 2680 ,वडीवळे 6780 , मुळशी 28 हजार, पवना 13790 तर कासारसाईमधून 3500 क्युसेकचा विसर्ग आहे .

उजनी धरण टक्केवारीची पन्नाशी ओलांडून शंभरीकडे वाटचाल करत आहे. उजनी धरणातून वीज निर्मिती कालवा व सीना-माढा बोगद्यात पाणी सोडले जात आहे. धरणातून सोलापूर लाभक्षेत्रातील शेतीसाठी कालवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला शासनाने काल मंजुरी दिली. वीज निर्मितीसाठी उजनीतून 1600 क्युसेक पाणी सोडले जात आहे.

गेल्या चोवीस तासात मुळशी 190 मिमी, वडीवळ 144 मिमी, पवना 180 मिमी, टेमघर 111 मिमी, वरसगाव 120 मिमी, पानशेत 123 मिमी अशा पावसाची नोंद झाली आहे.

Last Updated : Aug 4, 2019, 11:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details