सोलापूर - जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरणात 55 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची आवक वाढत आहे. पुणे जिल्ह्यातून 20 हजार क्युसेकने पाणी उजनीत येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण एकूण 117 टीएमसी क्षमता असलेले धरण आहे. यावर्षी 18 ऑगस्ट रोजी उजनी धरण हे 55 टक्के भरले असून धरणात 92 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
उजनी 55 टक्के भरले; धरणात 92 टीएमसी पाणीसाठा - उजनी धरण न्यूज
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण एकूण 117 टीएमसी क्षमता असलेले धरण आहे. यावर्षी 18 ऑगस्ट रोजी उजनी धरण हे 55 टक्के भरले असून धरणात 92 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
उजनी धरण
पुणे जिल्ह्यातील बंडगार्डन येथून 17 हजार तर दौंड येथून 20 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग उजनी धरणात येत आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.