पंढरपूर (सोलापूर) -पुणे जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनी जलाशयामध्ये पाणी सोडण्यात आले. त्यामुळे उजनी जलाशयात आता 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तर सातारा जिल्ह्यातील संततधारेमुळे वीर धरणातून नीरा नदीत 8000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. तसेच दौंडमधून 12300 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. त्यामुळे उजनी धरण तीन दिवसांमध्ये 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाल्याची माहिती जलसंधारण विभागाकडून देण्यात आली आहे.
आणखी भरण्याची शक्यता -
मागील 10 ते 12 दिवसांच्या कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यातील घाट माथ परिसरात पावसाची संततधार पाहायाला मिळाली. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये हे 80 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तर त्या धरणातून उजनी धरणात पाणी सोडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून उजनी जलसाठ्यात 50 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तर लवकरच दौंड येथील विसर्गामुळे उजनी 60 टक्के भरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.