सातारा -लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत उमेदावर उदयनराजे भोसले यांचे लवकरच पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. उदयनराजे यांना लवकरच राज्यसभेवर घेण्यात येणार असल्याचेही संकेत त्यांनी सांगितले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माढा तालुक्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देताना बोलत होते.