सोलापूर- स्वस्तात सोने देतो अशी थाप मारून विजयपूरहुन सोलापूरला बोलावून घेत दरोडेखोरांनी तलवारीचा धाक दाखवून काही नागरिकांना लुटले होते. या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने दोन दरोडेखोरांना अटक करून मोबाइल आणि दुचाकी वाहने जप्त केली आहेत. महादेव सुभाष भोई(वय वय 26 रा मिरी,ता मोहोळ),अशोक उर्फ रमेश काळे(वय 30 रा अरबळी,ता मोहोळ) अशी त्या आरोपी दरोडेखोरांची नावे आहेत.
स्वस्त सोने घेण्यासाठी विजयपूरहुन आले नागरिक-
कर्नाटक राज्यातील विजयपूर येथील काही नागरिकांना सोलापूर जिल्ह्यातील काही दरोडेखोरांनी स्वस्तास सोने देण्याची थाप मारून 1 ऑक्टोबर2020 ला सोलापूरला बोलावून घेतेले. ठरल्याप्रमाणे मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंत्रोळी गावाच्या शिवारात विजापुरचे नागरिक सोने खरेदीसाठी आले. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी विजयपूरहुन आलेल्या तक्रारदरांना तलवारीचा धाक दाखवून लुटले. विरोध केला असता लोखंडी रौडने मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.
स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या-
मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दरोड्याची गंभीर दखल स्थानिक गुन्हे शाखेने घेतली होती. एपीआय मांजरे, एएसआय ख्वाजा मुजावर यांनी एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवली की, या दरोड्यातील संशयित आरोपी हा बेगमपूर येथे मासे विकत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताबडतोब महादेव भोई याला मासे विकताना ताब्यात घेऊन आधिक माहिती घेतली. त्यावेळी त्याने, स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून विजयपूरच्या नागरिकांची लूटमार केली असल्याची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या साथीदार अशोक उर्फ रमेश काळे याला देखील ताब्यात घेतले आणि दरोड्याचा छडा लावला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने कारवाई करत दरोड्याचा छडा लावला-
पर राज्यातील नागरिकांना सोलापुरात बोलावून लुटणाऱ्याना अटक करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने पार पाडली. यामध्ये पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील,एपीआय रवींद्र मांजरे,ख्वाजा मुजावर,नारायण गोलेकर,धनाजी गाडे,मोहन मनसावाले,धनराज गायकवाड,अक्षय दळवी,समीर शेख आदींनी केली.