पंढरपूर (सोलापूर) - जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी वाढत चालली आहे. कोरोनामुळे संचारबंदी असताना वाळू माफियांकडून वाळू उपसा करण्यास येत आहे. दरम्यान, एका वाहनातून वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली. यावरुन तहसीलदार त्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जात होते त्यावेळी दोघांना तहसीलदारांच्या गाडी समोर दुचाकी आडवी घालून कारवाईत अडथळा निर्माण केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय नाईकवाडी व कपील परचंडे, असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
वाळू माफियांची मुजोरी.. कारवाईसाठी जाणाऱ्या तहसीलदारांचे अडवले वाहन - mangavedha breaking news
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील संत दामाजी कारखाना चौकात एका वाळू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी निघालेल्या तहसीलदाराच्या वाहनासमोर दुचाकी आडवी लावत शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला आहे. या प्रकरणी तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मंगळवेढा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, मंगळवेढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक सुरू आहे. तहसीलदार रावडे यांच्याकडे नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यांना अशाच एका वाळू वाहतूकीची माहिती मिळाली. मंगळवेढा शहरातील दामाजी कारखाना चौकात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी जात असताना विना नंबरच्या दोन दुचाकी वाहन तहसिलदारांच्या वाहनासमोर अडवे लावत अडथळा निर्माण केला. त्यावेळी तहसीलदार यांच्यासह चालक अजित मुलाणी, विजय राजपूत यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.