महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

करमाळ्यात मुलाला पोहायला शिकवताना वडिलांसह मुलाचा मृत्यू - two drown while swimming in karmala solapur

मुलाला पोहायला शिकवताना वडिलांसह मुलाचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. करमाळा तालुक्यातील मलवडी येथील दुर्गुळे कोंढलकर वस्ती येथील विहीरीवर ही घटना घडली.

करमाळ्यात मुलाला पोहायला शिकवताना वडिलांसह मुलाचा मृत्यू

By

Published : Nov 9, 2019, 1:22 PM IST

सोलापूर- मुलाला पोहायला शिकवताना वडिलांसह मुलाचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. करमाळा तालुक्यातील मलवडी येथील दुर्गुळे कोंढलकर वस्ती येथील विहिरीत ही घटना घडली. शिवाजी भीमराव कोंढलकर (वय ३५ वर्ष) आणि मुलगा सोनू शिवाजी कोंढलकर (वय ११ वर्ष ) अशी मृतांची नावे आहेत.

करमाळ्यात मुलाला पोहायला शिकवताना वडिलांसह मुलाचा मृत्यू

सोनू हा अजितदादा पवार विद्यालय वडशिवणे येथे इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. मृत शिवाजी सोनूला पोहायला शिकवत असताना ही घटना घडली. विहिरीत पाणी जास्त असल्याने दोघांची प्रेत अद्याप सापडले नाही. मोटारीच्या साहाय्याने विहिरीतून पाणी काढण्याचे काम ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details