महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ट्रक-दुचाकीच्या अपघातात दोन जण ठार - ट्रक-दुचाकीच्या अपघातात दोन ठार सोलापूर

दोन दुचाकीस्वारांना वाचवण्याच्या नादात सिमेंटने भरलेल्या ट्रकचा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. जुलेखा मुर्तूज शेख आणि मोहसिन मेहबुब पठाण असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

Two Death in truck-bike accident
ट्रक-दुचाकीच्या अपघातात दोन ठार

By

Published : Dec 5, 2020, 3:15 AM IST

सोलापूर -दोन दुचाकीस्वारांना वाचवण्याच्या नादात सिमेंटने भरलेल्या ट्रकचा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. जुलेखा मुर्तूज शेख आणि मोहसिन मेहबुब पठाण असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. हा ट्रक दुचाकीला धडकल्यानंतर शेजारी असलेल्या भाजी विक्रेती महिला जुलेखा मुर्तूज शेख यांना देखील धडकला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार मेहबुब पठाण यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

ट्रक-दुचाकीच्या अपघातात दोन ठार

नो एन्ट्री मध्ये ट्रक आलाच कसा?

सिमेंटच्या पोत्यांनी भरलेला हा ट्रक अक्कलकोटवरून सोलापुरात आला होता. हा अपघात मल्लिकार्जून नगर परिसरात घडला आहे. दोन दुचाकीला वाचवण्याच्या नादात ट्रकने एका दुचाकीस्वाराला उडवले, तसेच शेजारी बसलेल्या भाजी विक्रेत्या महिलेला हा ट्रक धडकल्याने या अपघातात त्यांचा देखील मृत्यू झाला. मात्र शहरात जड वाहनांना बंदी असताना देखील, हा ट्रक शहरात आला कसा असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच संबंधित वाहतूक पोलिसांवर कारवाई होणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details