सोलापूर - पुणे–सोलापूर महामार्गावरील मोहोळजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास खासगी ( Accident On Pune Solapur Road ) लक्झरी बस व बोलेरो जीपचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात दोघांचा ( Two Death In Accident Near Mohol ) जागीच मृत्यू झाला. 22 एप्रील रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अरुण भानुदास केंगार (35) रा.पळशी, तालुका पंढरपूर व सुरेश बबन भोसले (30) रा. सुपली तालुका पंढरपूर, असे अपघातात मृत्यू झाालेल्यांची नावे आहेत.
दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक -पंढरपूर मोहोळ महामार्गावरील मोहोळ जवळील सारोळे पाटीजवळ खासगी लक्झरी बस एआर 06 ए 8417 व बोलेरो जीप क्रमांक एम एच 13 ए झेड 3869 या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. खासगी बस ही पंढरपूरहून मोहोळकडे येत होती, तर खासगी प्रवासी वाहतूक करणारी जीप ही मोहोळहून पंढरपूरकडे जात होती. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली आहे. या धडकेत बोलेरो मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात होताच लक्झरी बसचा ड्रायव्हर फरार झाला आहे. या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. बोलेरो जीपचा संपूर्ण चेंदामेंदा झाला आहे.