सोलापूर- कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या दोन लहान मुलांचा वाढदिवस गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटल येथे साजरा करण्यात आला. यामध्ये एका एक वर्षीय मुलीचा तर दहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.
कोरोना पॉझिटिव्ह दोन चिमुकल्यांचा वाढदिवस डॉक्टरांनी केला साजरा - डॉक्टरांनी साजरा केला चिमुकल्यांचा वाढदिवस
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत रुग्णालय म्हटले की तणावाचे वातावरण दिसून येते. मात्र, गुरुवारी सकाळी जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयामध्ये चिमकुल्यांच्या वाढदिवसामुळे वेगळेच वातावरण होते.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत रुग्णालय म्हटले की तणावाचे वातावरण दिसून येते. मात्र, गुरुवारी सकाळी जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयामध्ये वेगळेच वातावरण होते. एक वर्षाच्या मुलीचा वाढदिवस असल्याने त्यांचे नातेवाईक तिला भेटण्यास रुग्णालयात आले होते. मात्र, डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांनी तिचा वाढदिवस साजरा केला.
चिमकुल्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी औदुंबर मस्के त्याचबरोबर इतर त्यांचे सहकारी नर्स, डॉक्टर यांनी केक आणून दोन्ही रुग्णांना सकारात्मक ऊर्जा मिळवून दिली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी डॉक्टर नर्स व इतर कर्मचाऱ्यांचे याबद्दल कौतुक केले.