सोलापूर-शहराच्या मधोमध असणाऱ्या सिद्धेश्वर तलावात गुरुवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. पोहण्यासाठी आलेली दोन अल्पवयीन मुले पाण्यात बुडाली, यामध्ये एकाच मृत्यू झाला आहे. तर एकाला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सिद्धेश्वर तलावात दोन लहान मुले बुडाली; एकाचा मृत्यू तर एक गंभीर - solapur siddheshwar lake news
सिद्धेश्वर तलावात गुरुवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. पोहण्यासाठी आलेली दोन अल्पवयीन मुले पाण्यात बुडाली, यामध्ये एकाच मृत्यू झाला आहे. तर एकाला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तौफिक सादिक शेख (10) रा. पाथरूट चौक व साकीब नासिर सय्यद (13) पाथरूट चौक, असे दोघांचे नाव आहे. यामध्ये तौफिक शेख याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर साकीब सय्यद याला पाण्यातून बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आले. त्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. दोघेही गुरुवारी दुपारी पोहोण्याकरीता केले होते. सिद्धेश्वर तलाव शेजारी असलेल्या गणपती घाटात पाणी कमी असते, असा त्यांचा अंदाज होता. दोघांनी दुपारी दोनच्या सुमारास उडी घेतली. पण पाण्याची खोली अधिक होती. तौफिक शेख हा पूर्णतः बुडाला आणि साकीब सय्यद हा डुबक्या घेत होता. आजूबाजूच्या नागरिकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी पाण्यात उडी घेत वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण तौफिक शेख याला वाचविता आले नाही. साकीब सय्यद या मुलाला बेशुद्धावस्थेत बाहेर काढण्यात आले. त्याला ताबडतोब शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
हेही वाचा- मृत महिलांच्या थडग्यातून केसांची चोरी; गुजरातमधील विचित्र प्रकार