महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 7, 2021, 7:29 AM IST

ETV Bharat / state

सांगोल्यातून तस्करी होणारा 19 लाखांचा गुटखा जप्त; तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी 19 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी 2 गुटखा तस्करांना अटक करण्यात आली आहे. तर मुळ मालकावरही गुन्हा दाखल केला.

सांगोल्यातून तस्करी होणारा 19 लाखाच गुटखा जप्त
सांगोल्यातून तस्करी होणारा 19 लाखाच गुटखा जप्त

पंढरपूर - सांगोला येथे भाजीच्या टेम्पोमधून अवैधरित्या गुटख्याची तस्करी केली जात होती, यावर कारवाई करत पोलिसांनी 19 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी 2 गुटखा तस्करांना अटक करण्यात आली आहे. तर मुळ मालकावरही गुन्हा दाखल केला.

यामध्ये हसन शिरा शेख (रा. कोंढवा पुणे), अल्लाबक्ष अब्दुलगणी बागवान (रा. जवळकोट ता. तुळजापूर)अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर पुणे येथील मूळ मालक बालाजी कले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सांगोल्यातून तस्करी होणारा 19 लाखाच गुटखा जप्त

तंबाखूजन्य पदार्थ असणारा 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल सचिन देशमुख ,पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगोला महुद रोडवर संशयावरून (एम. एच. 14 जी. डी. 5244) या क्रमांकाचा टेम्पो अडविला. त्यावेळी टेम्पोची झडती घेतली असता, वरील बाजूस भाजीपाला आणि त्यामध्येच 34 पोत्यात गुटखा असल्याचे दिसून आले.
त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी सुमारे 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सांगोल्यातून तस्करी होणारा 19 लाखाच गुटखा जप्त

तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

याबाबत सांगोला पोलीस ठाण्यामध्ये तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील चालक हसन शिरा शेख, अल्लाबक्ष अब्दुलगणी बागवान यांना अटक करण्यात आली. तर मूळ मालक असणाऱ्या बालाजी कले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर येथील अन्न व भेसळ कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मंगेश लवटे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सांगोला पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details